Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'सीड बॉल' चित्रपटा निमित्त वनसंवर्धनासाठी 10 लाख वृक्ष लागवड तसेच १ कोटी सीड बॉल रुजवण्याचे लक्ष...निर्माता दिग्दर्शक अखिल देसाई...

'सीड बॉल' चित्रपटा निमित्त वनसंवर्धनासाठी 10 लाख वृक्ष लागवड तसेच १ कोटी सीड बॉल रुजवण्याचे लक्ष...निर्माता दिग्दर्शक अखिल देसाई 

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - साज एंटरटेनमेंट प्रस्तुत सिड बॉल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांचे भेटीला येणार असून याचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. 
   साज एंटरटेनमेंट चे माध्यमातून  सीड बॉल चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून, सीड बॉल चित्रपटा निमित्त 10 लाख वृक्ष लागवड तसेच १ कोटी सीड बॉल रुजवण्याचे लक्ष ठेवले असून, वृक्ष लागवडीचा शुभारंभ ठाणे येथील एम. एच. हायस्कूल मध्ये दि 26 नोव्हेंबर 2024 रोजी पार पाडला.
     यावेळी 150 शालेय विध्यार्थी यांना वृक्षबीज वाटत व बीज लागवडी साठी कुंडी चे वाटप करण्यात करण्यात आले,  यावेळी सीड बॉल असलेली लाईफ बॅग चे ओपनिंग माय लाईफ स्ट्याईल चे लीगल ऍडव्हायझर प्रथम डायमंड सुनील सागवेकर यांचे हस्ते करण्यात आले.         
     या वेळी शालेय परिसरात वृक्ष रोपण करून मिशन 10 लक्ष वृक्ष लागवडीचा तसेच 1कोटी सीड बॉल वितरणाचा शुभारंभ ही करण्यात आला.
     यावेळी सीडबॉल चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक अखिल देसाई यांनी सीड बॉल चित्रपटा बाबत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ग्लोबल वॉर्मिंगचे चटके सगळीकडे बसायला लागले आहेत. तापमानवाढ होत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. जमिनीवरची मातीच संपत चालली आहे. हिरवळ, झाडं, निसर्ग, रानं वनं, पर्यावरणाची हानी होत आहे... आपणच जबाबदार आहोत त्यांच्या ऱ्हासाला. पण वेळ गेलेली नाही. निसर्गानं दिलेलं दान काही संपलेलं नाही. अजूनही तारतम्य बाळगून प्रयत्न केले तर पुन्हा निसर्गराजा प्रसन्न होईल. 
     गरज आहे ती फक्त तुमच्या आमच्या इच्छाशक्तीची आणि प्रयासांची, झाडं लावा, जोपासा, वाढवा. वसुंधरेला वाचविण्याचा निर्धार करू या. 
      'सीड बॉल्स'च्या माध्यमातून वनसंवर्धनासाठी एकत्र येऊ या. हे एक मिशन आहे, एक व्हिजन आहे. आजचीच नव्हे तर उद्याची आणि परवाचीही पिढी सुदृढ, निरामय, प्रसन्न, संस्कारक्षम होण्यासाठी आज एकतरी झाड लावू या. चला तर मग, संकल्प करू या. आमचं मिशन आहे १० लाख झाडं लावण्याचं. आणि १ कोटी सीड बॉल्स तयार करून रानोमाळावर ते रुजवण्याचं, या आमच्या उपक्रमाला तुमची सर्वांची मोलाची साथ ही तितकीच गरजेची आहे.
       या उपक्रमात सर्व नागरीकही सहभागी होऊ शकतात, त्यासाठी किमान ९९ रुपयांचे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला सीड बॉल असलेली लाईफ बॅग मिळेलच, शिवाय निसर्गयात्री होण्याचा सन्मानही मिळेल, तसेच किमान ९९ रुपयात तुम्हाला मिळणार आहे 'शिष्यवृत्ती' या सिनेमाचे सबस्क्रिप्शन.आणि 'मिशन १० लाख वृक्षारोपण' उपक्रमात तुमच्या सक्रिय सहभागाची नोंद होईल. 
    या निमित्त शालेय विध्यार्थी व नागरिकांच्या सहकार्याने १ कोटी सीड बॉल्सची रुजवात' करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साकार होईल. या उपक्रमात आपला सर्वांचा सहभाग मिळाल्यास आनंदच होईल असे मनोगत निर्माता दिग्दर्शक अखिल देसाई यांनी व्यक्त केले.
     या वेळी सहनिर्माता अनिल देवळेकर,अभिनेत्री चित्रा देशमुख, एम एच हायस्कूलच्या प्रतीक्षा बोर्डे मॅडम, रोटरीचे ए.
 रवींद्रन ( चित्रपटाचे कार्यकारी निर्माते ) आदी मान्यवर उपस्थित होते. 
     मिशन १० लाख झाडं लावण्याचं. आणि १ कोटी सीड बॉल्स  रुजवणे या उपक्रमात तुम्हालाही सहभागी व्हायचं असल्यास सोबत दिलेल्या वेबसाईट वर संपर्क करू शकता...
https://seedballmovie.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement