Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


" जागतिक रंगभूमी दिन "

.          
 .                  " जागतिक रंगभूमी दिन  "

मुंबई दि. २५ -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - "अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद " संलग्नित " मराठी नाट्य कलाकार संघ " आयोजित जागतिक रंगभूमी दिवस न चुकता दरवर्षी याच दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात येतो आणि एका जेष्ठ कलावंताचा जीवनगौरव पुरस्कारानी सन्मानित केले जाते!  २५ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे लोकप्रिय संगीतनाट्य अभिनेता - कै. भालचंद्र पेंढारकर ( अण्णा ) यांचा जन्म दिवस..... 
दिप प्रज्वलित करताना मंत्री - उदयजी सामंत, शिवाजी शिंदे, अभिनेता - प्रशांत दामले, अभिनेता - सुशांत शेलार आणि जेष्ठ अभिनेते - मोहन जोशी.
     यंदा लोकप्रिय  जेष्ठ अभिनेते - मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्राचे उद्योग मंत्री - श्रीमंत उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.... 
या  शानदार सोहळ्यात रंगमंचावर
सहभागी झालेले  रंगकर्मी  - शिवाजी शिंदे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष व लोकप्रिय अभिनेता - प्रशांत दामले, मंत्री - उदयजी सामंत साहेब, जेष्ठ अभिनेते - मोहन जोशी, अभिनेता - सुशांत शेलार, नाट्यदिग्दर्शक - वक्ता - अजित भुरे, विजय सुर्यवंशी, अभिनेता - विघ्नेश जोशी यांच्या आणि नाट्यगृहातील जेष्ठ - कनिष्ठ रसिक प्रेक्षकांच्या बहुगर्दित " दादर- माटुंगा " येथील यशवंत नाट्यगृहातील रंगमंचावर सोहळा पार पडला. 
     मोहन जोशी यांना मानपत्र प्रदान करताना - प्रशांत          दामले, मंत्री - उदयजी सामंत साहेब आणि मानपत्र         स्वीकारताना - मोहन जोशी व सेजारी सुशांत शेलार.
       कार्यक्रम दोन भागात विभागून आयोजित करण्यात आला होता, अर्थात "एक मध्यांतर" दरम्यानच्या एका क्षणी  "बाळगंगा पडवणे श्रमसंघ " च्यावतीने  नाट्यसमीक्षक , कवी - सु. बा. सरपडवळ ( गंगाई-गंगासुत ) यांच्या हस्ते जेष्ठ अभिनेते - मोहन जोशी यांचा सन्मानपूर्वक खास सत्कार करण्यात आला. 
     गायक, अभिनेता - विघ्नेश जोशी हे जेष्ठ अभिनेते -        मोहन जोशी यांची मुलाखत घेताना.....
मध्यांतरच्या आधी मनोरंजनासाठी प्रसिद्ध नाटकातील छान लोकप्रिय सुंदर गीत- नाट्यसंगीत सादर करण्यात आले होते, ह्यात भाग घेणारे गायक कलावंत - गौतम कामत (अवघे गर्जे पंढरपूर. ) , कुमारीमैत्री नायक  ( प्रितीचा कल्पतरू जो मला लाभला.) , धवळ भागवत ( श्रीरंगा कमला कांता.) , तन्वी गोरे ( उगवला चंद्र पुनवेचा  ! दाही दिशा कशा फुलल्या. उगवला. ) या गाण्याने तर दर्दी रसिकांनी टाल्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला  !
 सत्कार प्रसंगी अभिनेता - सुशांत शेलार  तर सन्मानपूर्वक सत्कार करताना  नाट्यसमीक्षक, कवी- सु. बा. सरपडवळ आणि सत्कार   स्वीकारताना  अभिनेते - मोहन जोशी व रंगकर्मी - शिवाजी शिंदे.
      निवेदन , गायक - ज्ञानेक्ष भालचंद्र पेंढारकर यांनी विघ्नेश जोशी यांना जुन्या आठवणी साठी बोलते करून चक्क बाजापेटी २१ वर्षांनी नाट्यसंगीत वाजवण्यास लावले! आणि त्यांना तबल्यावर - सुहास चितळे यांनी उत्कृष्ट साथ सोबत केली.      
    हा सोहळा सर्वोत्तम झाला तो अभिनेता - विघ्नेश जोशी यांच्या उत्तम सुत्रसंचालनाने आणि मोहन जोशी यांच्या खुसखुशीत मुलाखतीचा कार्यक्रम छान रंगला होता .....! 
          --- मुंबई प्रतिनिधी मराठी रंगभूमीवरून....
                 नाट्यसमीक्षक सु. बा. सरपडवळ 
                             9167589152
               संपादक व छायाचित्र --  संजय डुबल.
                             9172830799

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement